आमच्या विषयी
निर्भीडपणे पण पुराव्यानिशी सत्य वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी फ्रीडम पब्लिकेशन या प्रकाशन संस्थेची निर्मिती झालेली आहे. प्रबोधन, परिवर्तन आणि साथीला थोडसं मनोरंजन ह्या त्रिसूत्रीवर वाटचाल करण्याचा आमचा प्रयत्न असेल. वाचकांच्या विचारप्रक्रियेला गती देणे, त्यांना दुर्मिळ व विविध संदर्भ-माहिती पुरविणे, मेंदूची वैचारिक भूक भागविणे आणि नम्र व शीघ्र सेवा पुरविणे यासाठी आम्ही कायम प्रयत्नरत असू. मराठी , हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषेतील पुस्तके आम्ही प्रकाशित करीत असतो. आपण या वेबसाईट वरील 'आमची पुस्तके' या विभागात जाऊन आम्ही प्रकाशित केलेल्या पुस्तकांची सविस्तर माहिती घेऊ शकता. त्या पुस्तकांवरील मान्यवर व वाचकांचे अभिप्राय-प्रतिक्रिया आपण 'न्यूज व मीडिया' विभागात जाऊन व्हिडीओ आणि लिखित स्वरूपात बघू शकता. आणि आपल्याला आवडलेले पुस्तक घरपोच मागवू शकता. आपण लेखक असाल आणि आपल्याला स्वतः चे पुस्तक प्रकाशित करायचे असेल तर आपण आमच्या संपर्क क्रमांकावर किंवा इमेलवर संपर्क साधू शकता. प्रकाशनसोबतच विविध प्रकाशनांची मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील दर्जेदार पुस्तकेसुद्धा आम्ही आमच्या वाचकांसाठी लवकरच उपलब्ध करून देणार आहोत. फ्रीडम पब्लिकेशनला भेट दिल्याबद्दल मनापासून आभार. आपला विश्वास हीच आमची शक्ती. - फ्रीडम पब्लिकेशन टीम
